Pune Gramin

देहुरोडमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

By PCB Author

January 13, 2019

देहुरोड, दि. १३ (पीसीबी) – एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.११) दुपारच्या सुमारास देहुरोड येथील ज्युड स्कुल येथे घडली.

याप्रकरणी पिडित मुलीच्या वडिलांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमनसिंग नावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पिडित १२ वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी अमनसिंग याने कशाचेतरी आमिश दाखवून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी देहुरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अमनसिंग नावाच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अमनसिंग बाबत अद्याप माहिती कळु न शकल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.