Bhosari

देहुरोडमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग

By PCB Author

June 24, 2019

देहुरोड, दि. २४ (पीसीबी) – एका १७ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२२) आणि रविवार (दि.२३) शानु चायनिज, बारलोटानगर येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निखील म्हस्के (रा. सिध्दार्थनगर, मामुर्डी देहुरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी निखील याने अल्पवयीन १७ वर्षीय शाळकरी मुलीचा शनिवारी आणि रविवारी वारंवार पाठलाग करुन विनयभंग केला. तसेच मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. निखील याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.