देहुरोडमध्ये लॉज चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून दहा हजारांची मागणी

0
615

देहुरोड, दि. २९ (पीसीबी) – एका लॉज चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून दोघाजणांनी त्याच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२७) देहुरोड किवळे येथील न्यू साई लॉज येथे घडली.  

याप्रकरणी न्यू साई लॉजवर काम करणारा करण प्रकाश नायर (वय ३२, रा दत्तवाडी, मारुती राकस र्बीया सिटी, पुणे) याने देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी त्यानुसार अमित गजानन वानारे आणि त्याचा साथीदार आशिष किसन भटकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण नायर हे किवळे येथील न्यू साई लॉज येथे काम करतात. गुरुवारी रात्री पावनेअकराच्या सुमारास आरोपी अमित आणि आशिष हे दोघेही त्यांच्या लॉजवर आले. त्यांनी करण याच्या डोक्याला पिस्तूल लावून दहा हजार रुपयांची मागणी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि पसार झाले. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात अमित आणि आशिष या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.