देहुरोडमध्ये भरधाव कार दुकानात शिरल्याने नुकसान

0
521

देहुरोड, दि. १२ (पीसीबी) – भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार फुटपाथ तोडून थेट किराणा मालाच्या दुकानात शिरली. सुदैवाने दुकान बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास देहूरोड येथील मोहम्मद सुपर मार्केट या दुकानात घडली.

याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत मोहम्मद सुपर मार्केट या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे जीवितहानी टळली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून वाहनचालक फरार झाला आहे. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.