देहुरोडमध्ये दाबेलीची गाडी लावण्यावरून एका व्यावसायिकाची दुसऱ्याला रॉडने मारहाण

0
441

देहुरोड, दि. १८ (पीसीबी) – दाबेलीची गाडी लावण्यावरून झालेल्या वादात एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना देहू रोड येथे घडली.

राजू गुजर असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर आरोपी नागेश्वर विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही परराज्यातून आले आहेत. दोघांचाही कच्छी दाबेलीचा व्यवसाय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कच्छी दाबेलीची गाडी लावण्यावरून राजू आणि नागेश्वरमध्ये वाद झाला. माझ्या गाडीच्या शेजारी तुझी गाडी लावायची नाही असे नागेश्वर राजूला म्हटला. मात्र मी इथेच गाडी लावणार असे उत्तर राजूने दिले. त्यानंतर चिडलेल्या नागेश्वरने लोखंडी रॉडने राजूला मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत झाला आहे. राजूच्या मांडीवर व्रण उमटले आहेत. नागेश्वरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.