Pune Gramin

देहुरोडजवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By PCB Author

January 10, 2019

देहुरोड, दि. १० (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दिेलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना देहुरोड जवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर घडली.  

हरीष यशवंत शेलार (वय ५३, रा. गणेश आंगन, ई बिल्डींग, फ्लॅट नं.१, दापोडी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीष शेलार हे त्यांच्या दुचाकी वरुन देहुरोड जवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जात होते. यावेळी अज्ञात वाहन चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये हरीष हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. देहुरोड पोलीस आरोपी अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत.