देहुगावात दुकानांचे पत्रे उचकटून चोरट्यांनी लांबवला पावनेदोन लाखांचा ऐवज

0
695

देहुगाव, दि. २१ (पीसीबी) – दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातील १ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी (दि.२०) रात्री उशीरा देहूगावातील नवीन बायपास चौकात घडली.

याप्रकरणी संदीप भगवान शेळके (वय ४६, रा. एकता चौक, तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप यांचे देहूगाव मधील नवीन बायपास चौकात इंदू इंजिनिअर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांनी शेळके यांच्या दुकानाचे तसेच आसपासच्या दुकानाचे पत्रे उचकटून तब्बल १ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चारुन नेला. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.