देहुगावातील इंद्रायणी नदी प्रदुषित झाल्याने हजारो माशांचा मृत्यू

0
592

देहुगाव, दि. ९ (पीसीबी) – दिवसेंदिवस वाढत चाललेल जल प्रदूषण त्यात खालावत चाललेली पाणी पातळी यामुळे आज (रविवार) सकाळच्या सुमारास देहुगावातील गोपाळपुरा भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रात हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आले. अंगावर शहारे आणणारे हे दृश्य भयान होते.

सध्या देहुगावातून वाहणाऱ्या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपरणी साचलेली आहे. तसेच कंपन्यांचे दुषित पाणी देखील कसलीही प्रक्रिया न करता यामध्ये सोडले जाते. यामुळे नदीतील जलचरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून हजारो मासे मृत्यूमुखी पडताना दिसत आहेत.

दरम्यान, कंपन्यांचे दुषित पाणी नदी पात्रात सोडण्यापासून रोखले पाहिजे. तसेच देहुगावात राबवण्यात आलेली सांडपाणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.