‘देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो की बंद करुन झोपतो? – भाजप नेते राम कदम

0
537

 

मुंबई, दि.४ (पीसीबी) – ‘रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा आणि आवश्यक तितके लाईट चालू ठेऊन, दिवे किंवा मेणबत्ती लावावी, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला केले.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना सवाल विचारला आहे. ‘नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांशी आणि अन्य तज्ज्ञांशी चर्चा न करता केवळ अभ्यासपूर्ण व्हाट्स अॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केले आहे,’ अशी टीका कदम यांनी केली आहे. असे वृत्त एका मराठी वाहिनीने ने दिले आहे.

कदम म्हणाले, ‘देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो की बंद करुन झोपतो? यावरच तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो,’ अशी जहरी टीका राम कदम यांनी केली आहे. कदम यांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत काय उत्तर देतायत हे पाहणे आता म्हत्त्वाचे आहे.