देशासाठी भाजप, संघाच्या घरातील कुत्रा तरी मेला आहे का? – मल्लिकार्जुन खरगे

0
458

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – देशासाठी काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह असंख्य नेते, कार्यकर्त्यांनी  बलिदान दिले आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांच्या घरातील एक कुत्रा तरी मेला आहे का ? असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.