देशभरात पुलवामाचा निषेध; लोणावळ्यात रेल्वे टिसीकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; गुन्हा दाखल

0
800

लोणावळा, दि. १५ (पीसीबी) – पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्महघाती हल्ल्यात ४२ जवान शहिद झाले. या घटने विरोधात देशा भरातून संतापाची लाट उसळली असताना पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील शिवाजी चौकात रेल्वेत टिसी या पदावर कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने स्थानिक नागरिकांनी रोश व्यक्त केला.

उपेंद्रकुमार श्रीवीर बहादुरसिंग (वय ३९, रा. पटाणा, राज्य बिहार, सध्या रा. रेल्वे क्वार्टर, लोणावळा) असे या टिसीचे नाव असून त्याच्या विरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत सर्व पक्षीय नेत्यांनी लोणावळा पोलीसांची भेट घेऊन आरोपी बहादुरसिंग याच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. तर रेल्वे प्रशासनाने बहादुरसिंग यांना तातकाळ निलंबीत केले असल्याची माहिती समोर येत आहे.