“देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या, आता 8 लाख झालेत DJ वाजवून बघूया का”

0
358

मुंबई,दि.१४(पीसीबी) – शेठ, देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या आता आठ लाख झाले आहेत. आपण डीजे वाजवून पाहूया का?, असं ट्विट करत प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही करोना नियंत्रणात आलेला नाही. उलट लॉकडाउनच्याच काळात देशभरातील लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर विशाल दादलानी याने ट्विट करुन सरकारवर टीका केली आहे.शेठ, देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या आता आठ लाख झाले आहेत. आपण डीजे वाजवून पाहूया का?, असं ट्विट करत त्याने उपरोधिक टोला लगावला आहे.

दरम्यान, विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चक्क सरकारवर निशाणा साधला आहे.