देशात समान नागरी कायद्याचा दिवसही दूर नाही- उद्धव ठाकरे

0
404

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कुटुंब नियोजनावर भाष्य केले. पंतप्रधानांनी कुटुंब नियोजनावर मांडलेले विचार हे ‘समान नागरी कायद्या’च्या दृष्टीने तिसरे पाऊल आहे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

तिहेरी तलाकविरुद्ध कायदा केलात. कश्मीरमधील ३७० कलम काढून फेकले. आता देशात समान नागरी कायदा कधी लागू करणार? आम्हाला खात्री आहे आता तो दिवसही दूर नाही.

पंतप्रधान मोदी यांनी ‘समान नागरी कायद्या’च्या दृष्टीने तिसरे पाऊल कालच्या स्वातंत्र्य दिनी टाकले. पंतप्रधानांनी कुटुंबनियोजनाचा डंका लाल किल्ल्यावरून वाजवला आहे. लोकसंख्यावाढ हे देशापुढील आव्हान आहे व कुटुंबनियोजन ही देशभक्तीच आहे, असे ठासून सांगितल्याने मुसलमान समाजाने कुटुंबनियोजन त्यांच्या ‘शरीयत’ला मान्य नसल्याची बांग ठोकू नये असे अग्रलेखात म्हटले आहे.