Desh

“देशात सध्या हिंदुत्व द्वेषाची स्तुनामीसारखी लाट आहे – असदुद्दीन ओवेसी

By PCB Author

March 12, 2020

दिल्ली, दि.१२ (पीसीबी) – बुधवारी लोकसभेत दिल्लीतील हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान बोलताना “देशात सध्या हिंदुत्व द्वेषाची स्तुनामीसारखी लाट आहे. तसेच दिल्ली हिंसाचारावर सरकारला कोणतेही दु:ख नाही,” असे म्हणत यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

दिल्लीतील ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला त्या ठिकाणी सर्वपक्षांच्या सदस्यांचे एक प्रतिनिधीमंडळ पाठवण्यात यावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून त्या घटनेचा तपास करण्यात यावा, अशी मागणी ओवेसी यांनी केली.