देशात भाजप ३०० जागांचा आकडा पार करून पुन्हा बहुमत मिळवेल- रावसाहेब दानवे

0
390

मुंबई, दि. २० (पीसीबी) – महाराष्ट्रात युतीला ४२च्या वरच जागा मिळतील, ४१ होणार नाहीत. तसेच देशात भाजप ३०० जागांचा आकडा पार करून पुन्हा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए पुन्हा पुन्हा सत्तेच्या जवळ जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावर रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, “मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. अनेक पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिले, कोणी सायकलवर निघाले तर कोणी हत्तीवर पण जनता भरकटली नाही. राज्यभरातल्या सभांमधून लोकांमध्ये उत्साह दिसत होता.”

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यातील समान जागेमुळे भाजप आणि शिवसेना आता मोठे-छोटे नाही तर जुळे भाऊ झाल्याची प्रतिक्रिया उमटली. याबद्दल विचारले असता रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, “प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान मोदी उभे होते, असे शिवसेना-भाजपने एकत्र काम केले. त्यामुळे मोठा भाऊ, लहान भाऊ असे काही नाही. आम्ही विधानसभेला पण एकत्र लढा देऊ.”