देशात बेरोजगारी,गरीबी वाढत असताना नावे बदलण्याची गरज काय?- शरद पवार

0
361

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – देशात सध्या नावे बदलण्याचे फॅड आले आहे. आग्रातील   ताजमहल जो हिंदूस्थानची इज्जत  आहे. त्याचे नाव बदलण्याची काय गरज आहे. त्यामुळे बेरोजगारी सुटणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.  देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन  लक्ष विचलित  केले जात आहे. देशात बेरोजगारी,गरीबी  वाढत असताना नाव बदलण्याची गरज नाही. सत्ताधारी लोकांना चुकीच्या मार्गावर नेले जात आहे, असा आरोपही  पवार यांनी यावेळी केला.