देशात दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणणं गरजेचं – मोहन भागवत

0
377

नवी दिल्ली,दि.१८(पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी देशातील एका दाम्पत्यानं दोनं मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं आहे.

हा कायदा लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आमलात आणणं आवश्यक आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला नियंत्रण आणता येईल. हा कायदा देशात आणण्यासाठी संघाची आग्रही भूमिका असेल. या कायद्याविषयीची जनजागृती मोहिमही राबवली जाणार असल्याचं, मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

लवकरच भव्य राम मंदिराची स्थापन करण्यात येईल. मंदिराची स्थापना झाल्यावर राम मंदिराची ट्रस्ट स्थापन झाली की संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.