Desh

देशात दहशतवादी शिरल्याची माहिती; हाय अलर्ट जारी

By PCB Author

August 20, 2019

राजस्थान, दि. २० (पीसीबी) – अफगाणिस्तानचा पासपोर्ट वापरून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतात शिरल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजस्थान गुजरातसह देशाभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजस्थानचे पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात. यासंबंधी एक पत्र जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पत्र मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच सर्वाधिक वर्दळीची ठिकाणे, हॉटेल्स, रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांमध्ये सखोल तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त संशयित वाहने आणि संशयित व्यक्तींवरही नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राजस्थान गुजरातसह देशाभरात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.