देशातील मृतांची संख्या जुलै महिन्यात 18 हजारापर्यंत जाण्याची शक्यता – साथरोग तज्ज्ञ संस्थेचा अहवाल

0
271

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – भारतात जुलै महिन्यात कोरोना व्हायरसचा प्रसार शिगेला पोहोचू शकतो. या काळात देशातील एकूण मृत्यूंची संख्या 18 हजारापर्यंत जाऊ शकते, असा अंदाज साथरोग व सार्वजनिक आरोग्य तज्ञ तसंच सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रोनिक कंडिशन्स या संस्थेचे संचालक प्रा. डी. प्रभाकरन यांनी वर्तवला आहे. प्रभाकरन हे लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेतही प्राध्यापक आहेत.

देशात कोरोनाची साथ चढत्या क्रमाने पुढे जात आहे. जुलै महिन्यात कोरोनाची स्थिती शिखरावस्थेत राहील. त्यावेळी भारतात कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 18 हजारापर्यंत असू शकते. सध्या वेगवेगळे सांख्यिकी मॉडेल वापरून अहवाल सादर करण्यात येत आहेत. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जुलै महिन्यात देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4 ते 6 लाख राहील. त्यात मृत्यूदर 3 टक्के राहील. त्यामुळे अंदाजे 12 ते 18 हजारापर्यंत मृत्यू होऊ शकतात, असं प्रभाकरन म्हणाले.