Desh

 देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान – मोहन भागवत

By PCB Author

September 17, 2018

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान असून  काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिले आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक महान नेते मिळाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज (सोमवार) येथे केले.

दिल्ली येथे संघाचे तीन दिवसीय अधिवेशन  आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते.  ते म्हणाले की, आपण तिरंग्याचा सन्मान करतो आणि आपण देशासाठीच जगले पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहणार. हिंदुत्व आपल्या समाजाला एकजूट ठेवते. संघाला लोक समजू शकत नाहीत. कारण संघ अनोखा आहे. सत्तेत कोण आहे, याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. फक्त आम्ही आपले कम करतो, असे ते म्हणाले.

भागवत पुढे म्हणाले की, संघाचे कार्य अद्वितीय आहे. या कार्यक्रमाला देशातील विविध भागातून विविध क्षेत्रातील नामांकित  व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी अभिनेत्री मनीषा कोईराला, अभिनेता रवी किशन, ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर आदी उपस्थित होते.