देशभरात प्लास्टिक बंदीसाठी कायदा करा आदित्य ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

0
532

दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – देशभरात प्लास्टिक बंदीसाठी कायदा करावा, अशी मागणी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी प्लास्टिकमुक्तीचे आवाहन केले होते, त्याबद्दल ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानत, प्लास्टिकचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी आणण्याची मागणी केली.

महाराष्ट्रासह वीस राज्यांनी प्लास्टिक बंदी लागू केली आहे, याकडेही आदित्य यांनी लक्ष वेधले. एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकवर बंदीमुळे, कापडी पिशव्यांसारख्या पर्यायी वस्तू बनवणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही व्यापाऱ्यांमध्ये काहीअंशी नाराजीचे वातावरण आहे.