Desh

देशभरातील डॉक्टरांचा बुधवारी एकदिवसीय संप

By PCB Author

July 30, 2019

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या मध्यवर्ती संघटनेने बुधवारी (दि.३१) एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशभरातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.   

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (एमसीआय) जागी नवीन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करणारे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक सोमवारी लोकसभेत  मंजूर करण्यात आले. या विधेयकाला  डॉक्टरांचा  विरोध आहे.

बुधवारी  आयएमएचे सर्व सभासद आपली सेवा बंद ठेवणार आहेत.  बुधवारी सकाळी ६ ते गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत केवळ अत्यवस्थ रुग्णच तपासले जातील. इतर सर्व सेवा बंद ठेवून देशभरात निदर्शने, उपोषण व अन्य सनदशीर मार्गांनी निषेध नोंदवण्यात येणार आहे,  असे आयएमएने सांगितले आहे.