Notifications

देवेंद्र फडणवीस यांनी केला विक्रम; विलासराव देशमुखांपेक्षा जास्त काळ राहिले मुख्यमंत्रीपदावर   

By PCB Author

December 04, 2018

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी मिळवला. हा मान मिळवणारे ते दुसरे मुख्यमंत्री  ठरले आहेत. या आधी काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावावर हा विक्रम होता. आज (मंगळवार)  मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला. विलासराव देशमुख यांच्या सलग दिवस मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम आता फडणवीस यांनी  मोडला.