Maharashtra

देवेंद्र फडणवीस यांच्या इतका लबाड आणि खोटारडा माणूस सापडणार नाही – मा.आमदार अनिल गोटे

By PCB Author

January 06, 2020

मुंबई, दि.६ (पीसीबी) – भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शिरपूर येथील एका सभेत ते बोलत होते. यावेळी बोलत असताना गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

याबाबत बोलताना गोटे म्हणाले की, ‘या जगाच्या पाठीवर देवेंद्र फडणवीस यांच्या इतका लबाड आणि खोटारडा माणूस सापडणार नाही, फडणवीस हे कोणाशीच खरे बोलत नाहीत, असे म्हणत गोटे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.