Maharashtra

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

By PCB Author

November 26, 2019

मुंबई,दि.२६(पीसीबी) – काहीवेळा पुर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, आता त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर करणार आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तेचं महानाट्य सुरु आहे. २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली होती. मात्र अजित पवारांच्या राजीनाम्या नंतर बहुमत सिद्ध करून दाखवणे फडणवीस यांना शक्य नसल्याने. त्यांना आज नाइलाजाने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असं कधीही ठरलं नव्हतं. न ठरलेल्या बाबींचा त्यांनी बाऊ केला, अनेक दिवस त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. आमच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ नव्हता. शिवसेनेनं निकाल पाहून ‘बार्गेनिंग पावर’ वाढवली. जे मातोश्री सोडत नाहीत, ते इतरांच्या पायऱ्या झिजवत होते, अशी सडकून टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

पत्रकार परिषद झाल्यानंतर फडणवीस आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर करण्यासाठी जाणार आहेत असे त्यांनी सांगितलं