“देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत; त्यांना माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही”

0
457

नागपूर,दि.२२(पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी “देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. तसंच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही” असं वक्तव्य केलं आहे. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

भय्याजी जोशी म्हणाले की, देवेंद्रजी यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्रीपदही अल्पायु आहे, असं म्हटलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

दरम्यान, भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.