Desh

देवेंद्रे फडणवीसांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

By PCB Author

March 03, 2020

दिल्ली, दि.३ (पीसीबी) – “आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. माझ्यावर व्यक्तीगत कुठलाही खटला नाही. कुठल्या ना कुठल्या आंदोलनाच्या केसेस आहेत आणि मी सगळया केसेस प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या आहेत. वकिलांच्या निर्णयानुसार प्रतिज्ञापत्र तयार केले. निवडणूक जिंकण्याच्या हेतूने केसेस लपवलेल्या नाहीत. निवडणूक विजयावर परिणाम होईल अशीही ती प्रकरणे नाहीत. सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करताना तयार झालेल्या केसेस आहेत” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणात सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिला आहे. खटला चालू नये, अशा विनंतीची याचिका फडणवीसांनी केली होती. सुप्रीम कोर्टाने हा खटला चालण्यास दिली परवानगी आहे. आता हा हा खटला सत्र न्यायालयात चालणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात देवेंद्रे फडणवीस यांनी केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.