दूरदर्शनवर लाईव्ह मुलाखती दरम्यान प्रसिध्द लेखिका रिता जतिंदरचे निधन

0
1932

दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – दूरदर्शनवर लाईव्ह मुलाखती दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जम्मू काश्मीरच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रिता जतिंदर यांचे निधन झाले.  

मिळालेल्या माहितीनुसार, रिता जतिंदर या गुड मॉर्निंग जम्मू काश्मीर या लाइव्ह कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना टीव्ही अँकरने प्रश्न विचारले त्यावर त्या बोलत होत्या. मात्र बोलता बोलता त्या अचानक शांत झाल्या आणि बेशुद्ध होऊन कोसळल्या. टीव्ही शोमध्ये असलेल्या दोन्ही टीव्ही अँकर्सना क्षणभर काय झाले हे समजलेच नाही. रिता जतिंदर अशाप्रकारे अचानाक खुर्चीवरून कोसळल्याने लाइव्ह कार्यक्रम बंद करून त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.