दुसऱ्यांची पोरे धुणीभांडी करण्यासाठी वापरुन घेत नाही; उध्दव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

0
444

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, म्हणून शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.

इतरांच्या पोरांचाही मी विचार करतो. दुसऱ्यांची पोरे धुणीभांडी करण्यासाठी वापरुन घेत नाही, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी पवारांवर  केली.

सुजय विखे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो. अमुक एका जागेचा हट्ट करतो. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही. आपल्या मुलाचा हट्ट ज्याने त्याने पुरवावा. माझ्या घरातील मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, असा शऱद पवारांनी   म्हटले होते.