दुर्देवी: बीडमध्ये कार अपघातात गर्भवती महिलेचा होरपळून मृत्यू

0
598

बीड, दि. २१ (पीसीबी) – बीडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात गर्भवती महिलेचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ म्हणजेच कल्याण विशाखापट्टणम मार्गावर बीडमधील कोळगावजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज एक कार आणि स्कॉर्पिओचा अपघात झाला असताना बाईकही अपघातग्रस्त गाड्यांना येऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती, की अपघातग्रस्त कारने अचानक पेट घेतला.कारमध्ये बसलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तिघे जण गाडीतून बाहेर पडले, मात्र एक महिला गरोदर असल्यामुळे तिला बाहेर पडता आले नाही. गाडी पूर्णपणे पेटल्याने या महिलेचा करुण अंत झाला. अपघातात अन्य महिलाही गंभीररित्या भाजली असून तिच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.