Pimpri

दुर्गा टेकडीवर रंगला ‘कोरोना योद्धा कृतज्ञता सोहळा’

By PCB Author

January 19, 2021

पिंपरी, दि.19 (पीसीबी) :आपला परिवार व चला मारू फेरफटका” सदस्यांनी निसर्गरम्य दुर्गा टेकडी येथे मकरसंक्रांत हा सण एकमेकांना आनंद वाटत मोठ्या उत्साहात साजरा केला.कोरोना काळात समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. समाजातील विविध व्यक्तींचा कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे,शिव व्याख्याते- लेखक, प्रा.नामदेवराव जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अनंत कोराळे आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी हास्य योगा च्या माध्यमातून परिवाराच्या सदस्या शिला झांबरे यांनी सर्वांना”नको औषध,नको गोळ्या, हसता हसता वाजवा टाळ्या”हा सल्ला दिला. वैशाली आवटे यांनी भावगिताने कार्यक्रमाची सुरुवात केली.पोर्णिमा देशमुख यांनी संस्थेच्या मागील सात वर्षांपासूनचा लेखाजोखा मांडत प्रस्ताविक केले.

कोरोना या महामारीला पायाखाली घेऊन, सतत झुंज देऊन समाजात मोठा आदर्श निर्माण करणारे डॉ श्रीखंडे, शिल्पा शिरोळे, सोमनाथ सलगर,क्षितिज देशमुख, कोमल कदम,सरला आवटे,अनिता वांजळे, बाळासाहेब राठोड, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, एकनाथ लोहार, दगडु चिंचाने, वाय.डी.शिंदे, वरिष्ठ बँक व्यवस्थापिका अनिता होनराव, मुख्य अधिकारी (स्वच्छता) नवी मुंबई मधील प्रल्हाद खोसे, तारु, दिनेश कसबे, बळीराजा राजेंद्र थिगळे, महेश शिंदे, अत्यावश्यक सेवेतील गोरक्ष तिकोने,किरण कांबळे, अश्विनी बांगर,हेमलता पाटील, पत्रकार व प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड संस्थेचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ,रोहीत खर्गे यांना कोरोना योद्धा-कृतज्ञता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

शिव व्याख्याते-लेखक प्रा.जाधव म्हणाले ज्याला ह्रदय आहे असेच मावळे गड किल्ल्यांवर जातात.”जे मारतील गड किल्ल्यांवर फेरफटका, त्यांना येणार नाही कधी ह्रदयाला झटका.” खासदार बारणे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. आपण आपल्या या परिवाराची ताकत सिमीत न ठेवता समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे. ही ताकद समाजासाठी,देशसेवेच्या उत्तम कार्यासाठी उपयोगात आणली पाहीजे.मी ही या परिवाराचा एक सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी राजेश देशमुख,किरण कांबळे,अनिल शर्मा,पराग खाडीलकर, दिपक मराठे, संदिप दरवेशी, उद्धव वांजळे,पोर्णिमा देशमुख,प्रतिभा थोरात, स्वामीसर,अजित भालेराव, बाळासाहेब मरळ, महेंद्र भाटलेकर, यशवंत महाजन, विजय शिर्के,संदिप दरवेशी, किरण चव्हाण, दत्तात्रय कुंभार, वामन आवटे, प्रविण जाधव, ज्योती प्रकाश, गिरीश काटे, पांडूरंग राऊत, गोरक्ष तिकोने, प्रविण जाधव,दिलीप गायकवाड, अविनाश दांगट यांनी विशेष योगदान दिले.

बाळासाहेब मरळ यांनी आपल्या पहाडी आवाजात प्रेरणा गित सादर केले.सुत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. या वेळी उपस्थितांनी पर्यावरणाची शपथ घेतली.शपथ वाचन प्रल्हाद खोसे यांनी केले. मान्यवरांचे ‘आपला परिवार’या संस्थेचे संस्थापक एस.आर.शिंदे यांनी कोरोना महामारीने जिवन” शिस्तीत पण मस्तीत” जगायाला शिकवले असा विचार मांडत कोरोना योद्धा यांना ‘फेरफटका सलामी’जिंकलास मित्रा व जिंकलीस सखी म्हणत आभार मानले.