Notifications

दुबईतल्या अब्जाधीशाने या अभिनेत्रीला दिली आपल्यासोबत एक रात्र घालवण्याची ऑफर; त्या कुत्र्याला धडा शिकवणार असल्याची अभिनेत्रीची पोस्ट

By PCB Author

November 24, 2018

तिरूअनंतपुरम, दि. २४ (पीसीबी) – दुबईतील एका अब्जाधीशाने मल्याळम अभिनेत्री नेहा सक्सेनाला आपल्यासोबत एक रात्र घालवण्याची ऑफर दिली. त्यामुळे संतापलेल्या नेहाने या अब्जाधीशाने आपल्या पीआरसोबत केलेले व्हॉट्सअॅप संभाषण सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तसेच या अब्जाधीशाची तुलना कुत्र्यासोबत केली आहे. या कुत्र्याला आपण धडा शिकवणारच असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.