दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेण्यावरून झाला वाद; रिक्षाचालकाने…

0
216

तळवडे, दि. २५ (पीसीबी) – रिक्षा चालकाने एका दुचाकीस्वाराला दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, रस्त्याच्या बाजूला जागा नसल्याने त्यावरून दुचाकीस्वारांसोबत वाद घालत रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता तळवडे-त्रिवेणीनगर सार्वजनिक रोडवर मेटाटेक सोल्युशन कंपनीसमोर घडली.

तालीम बादशाह शेख (वय 25, रा. तळवडे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे-त्रिवेणीनगर रोडवरमेटा टेक सोल्युशन कंपनीच्या समोर फिर्यादी शेख त्यांची दुचाकी घेऊन थांबले होते. त्यावेळी अनोळखी रिक्षा चालकाने शेख यांना दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, डाव्या बाजूला जागाच नसल्याने शेख यांनी दुचाकी बाजूला घेलती नाही. त्यावरून रिक्षा चालकाने शेख यांच्या डोक्यात टपली मारली. यावर शेख त्या रिक्षा चालकावर ओरडले. त्यानंतर रिक्षात मागे बसलेल्या व्यक्तीने शेख यांना शिवीगाळ करत वीट फेकून मारली. यात शेख यांच्या कपाळाला दुखापत झाली. त्यानंतर रिक्षा चालकाने शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.