दुचाकी चोरीचे सत्र पुन्हा सुरु… लॉक करून पार्क केलेली दुचाकी चोरीला

0
298

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) : सोसायटीसमोर लॉक करून पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी अंकुश चौक, निगडी येथे उघडकीस आली.

मोशाहिद लिलायत अली सय्यद (वय 33, रा. शरदचंद्रजी हाऊसिंग सोसायटी, अंकुश चौक, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद यांनी त्यांची 10 मोपेड दुचाकी (एम एच 14 / डी पी 9125) रविवारी (दि. 21) रात्री पावणे दहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या समोर लॉक करून पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र थांबले होते. आता चोरट्यांनी पुन्हा दुचाकी चोरीला सुरुवात केली आहे. वाहन चोरी ही पोलिसांची डोकेदुखी बनली आहे.