Pimpri

दुचाकीस्वार तरुणाचा मोबईल फोन हिसकावला

By PCB Author

September 22, 2020

दिघी,दि.२२(पीसीबी) – दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाचा मोबईल फोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता पुणे-आळंदी रोडवर काळूबाई मंदिराजवळ दिघी येथे घडली.

अवदूत सतीश वेल्हाळ (वय 24, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता फिर्यादी वेल्हाळ त्यांच्या दुचाकीवरून पुणे-आळंदी रोडने जात होते. दिघी येथील काळूबाई मंदिराजवळ आले असता त्यांच्या मागून पल्सर दुचाकीवरून अनोळखी चोरटे आले. त्यांनी वेल्हाळ यांच्या हातातील 15 हजार 990 रुपये किमतीचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि पुण्याच्या दिशेने निघून गेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.