दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पाउण लाखाची सोनसाखळी हिसकावली

0
197

सांगवी, दि. १५ (पीसीबी) – दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला थांबवून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या गळ्यातून 75 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे एक वाजता सांगवी फाटा येथे घडली.

मयूर बाळासाहेब नागरस (वय 33, रा. नेहरूनगर, औंध गाव) यांनी याबाबत बुधवारी (दि. 14) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर त्यांच्या मोपेड दुचाकीवरून घरी जात होते. औंध गावाकडे जाणा-या पुलाजवळ सांगवी फाटा येथे दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी फिर्यादी यांना आवाज देऊन थांबवले. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 75 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. चोरटे सांगवी फाट्याच्या दिशेने पळून गेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.