दुचाकीवरुन गुटका विक्री करण्यासाठी जात होते; पण वाटेतच पोलिसांनी….

0
325

हिंजवडी, दि. 24 (पीसीबी) : गुटखा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास हिंजवडी मधील रूड हॉटेल जवळ करण्यात आली.

योगेश बापू भिकुले (वय 32, रा. शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आरिफ पूर्ण नाव माहिती नाही. रा. कोंढवा, पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश मोपेड दुचाकीवरुन गुटका विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हिंजवडी मधील रूड हॉटेल जवळ सापळा लावून कारवाई केली. त्यामध्ये आरोपी योगेश याच्याकडून प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, मोबाईल फोन आणि दुचाकी (एम एच 12 / क्यू झेड 1603) असा 57 हजार 713 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.