दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वाराला अटक

0
163

चिखली,दि.२४(पीसीबी) – दुचाकीच्या धडकेत एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता चिखली-आकुर्डी रोडवर नेवाळेवस्ती येथे घडली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

अभिषेक आद्या प्रसाद दुबे (वय 19, रा. साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी संतोषकुमार हिरा माळी (वय 40, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मीरा ओमप्रकाश माळी (वय 48, रा. नेवाळेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 22) रात्री पावणेनऊ वाजता मिरा माळी चिखली-आकुर्डी रोडवर नेवाळे वस्ती येथे ऐश्वर्यम कोर्ट यार्ड गेटसमोरील रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी आरोपी अभिषेक दुचाकीवरून (एम एच 12 / एल सी 4695) भरधाव वेगात जात होता. अभिषेख याच्या दुचाकीने मीरा यांना जोरदार धडक दिली. त्यात मीरा यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी अभिषेक याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.