दुखापतग्रस्त हार्दिक पंड्यानंतर आणखी दोन खेळाडू जखमी  

0
594

दुबई, दि. २० (पीसीबी) – दुबईत आशिया चषक स्पर्धा सुरू आहे. बुधवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या जखमी झाला. पंड्यापाठोपाठ आणखी दोन खेळाडू दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतूनच बाहेर गेले आहेत. पालघरचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांना दुखापतीमुळे बाहेर जावे लागले आहे.

त्यामुळे भारतीय संघात रवींद्र जाडेजाचे पुनरागमन झाले आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल यांच्या जागी दीपक चहर, सिद्धार्थ कौल आणि रवींद्र जाडेजा यांची वर्णी लागली आहे.

हार्दिक पंड्याला गोलंदाजी करताना कमरेची गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला स्टेचरवरुन नेण्यात आले. तर शार्दूल ठाकूरच्या जांघेला दुखापत झाली आहे आणि अक्षर पटेलच्या अंगठ्याला जखम झाली आहे. हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी ऑल-राऊंडर दीपक चहरची निवड करण्यात आली आहे.