दुखद: चाकणमध्ये गर्भवती विवाहितेची आत्महत्या

0
1329

चाकण, दि. १९ (पीसीबी) – गर्भवती विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१७) चाकण पोलिस ठाणे हद्दीतील खराबवाडी येथील सारा सिटीमधल्या सदनिकेमधून  उघडकीस आली.

प्रीती सावनकुमार प्रसाद ( वय  २१, रा. इटेली, ता. लालगंज, जि. आजमगड, उत्तरप्रदेश सध्या रा. खराबवाडी, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रीती ही गर्भवती होती. सोमवारी तीने खराबवाडी येथील राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रीतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चाकण पोलिस अधिक तपास करत आहेत.