‘दुःखद..! बलात्कारामुळे आणखी एक निष्पाप जीव गेला; सुप्रिया सुळे यांनी ट्विटर वर दिली प्रतिक्रिया

0
364

महाराष्ट्र, दि.७ (पीसीबी) –  उन्नाव बलात्कारातील पीडीतेचा आज मृत्यू झाला आहे. दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयात उपचार दरम्यानचे तिने अखेरचा श्वास घेतला आहे. रायबरेलीतून सुनावणीसाठी जाताना नराधमांनी तिच्यावर केरोसीन ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती ९० टक्के भाजली होती. अखेर काल रात्री ११ वाजून ४०  मिनिटांनी हृदय विकाराचा झटक्याने तिचा मृत्यू झाला.

‘दुःखद..! बलात्कारामुळे आणखी एक निष्पाप जीव गेला.उन्नाव जळीत आणि बलात्कार प्रकरणातील पिडीतेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.भावपूर्ण श्रद्धांजली. तिला आणि इतर बलात्कार पिडितांना न्याय मिळायलाच हवा. आता हे अति झाला आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी ट्विटर वर दिली.