दिशा पटानीबद्दलच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी हात जोडले!

0
447

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – अभिनेत्री दिशा पटानी आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी डिनर डेटसाठी मुंबईतील एका हॉटेलबाहेर एकत्र दिसले होते. यापूर्वी टायगर श्रॉफसोबत दिसणारी दिशा अचानक आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसल्याने नेटिझन्सनी तिला तुफान ट्रोल केले. परंतु यावर आता आदित्य आणि दिशानेही भाष्य केले आहे.

डिनर ‘मातोश्री’वरच

विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी या दोघांचाही आज (१३ जून) वाढदिवस आहे. आज मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत, वाढदिवसाला खास व्यक्तीकडून स्पेशल गिफ्ट आलं का, असा प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे लाजले आणि हसत पत्रकारांच्या दिशने हात जोडले. तर डिनर ‘मातोश्री’वर करणार की बाहेर यावर आदित्य पुन्हा लाजत म्हणाले की, डिनर मातोश्रीवरच करणार असल्याचं सांगितलं.

दिशाचे सडेतोड उत्तर

“मित्रासोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का, असा प्रश्न दिशाने ट्रोलर्सना विचारला आहे. पुरुष किंवा स्त्री यावरुन मी मित्रांची निवड करत नाही. मी ज्याच्यासोबत फिरते ते माझे मित्रच आहे. मी केवळ मुलींसोबतच मैत्री करत नाही. प्रत्येकाचेच मुली आणि मुले असे मित्र असतात, असे दिशा पटानी म्हणाली.