Pimpri

दिव्यांगांसाठी ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धाचे बक्षिस वितरण

By PCB Author

December 25, 2020

पिंपरी, दि. 25 (पीसीबी): दिव्यांगांसाठी आयोजित ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धाचे बक्षिस वितरण महापालिका भवनात छोटेखानी समारंभात करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला उपमहापौर केशव हनुमंत साहेब, प्राचार्य डॉ. शोभा खंदारे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे , डॉ . दयानंद जपणारे, डॉ . प्रभाकर बुधाराम, कृष्णा फडतरे, श्री गणेश सोनवणे , पराग मुंढे, श्री दत्तात्रय खुटवड , विशेष शिक्षक , दिव्यांग विद्यार्थी व पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बक्षीस वितरण समारंभामध्ये मध्ये उपमहापौर केशव हनुमंत घोळवे साहेबांनी दिव्यांग विद्यार्थ्यांकरता 20 हजार स्क्वेअर फुट मध्ये दिव्यांग भवन स्थापन करण्याचे काम चालू असल्याचे सांगितले . यामध्ये OT , PT , ST तज्ञ डॉक्टर मार्फत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत.

प्राचार्य डॉक्टर शोभा खंदारे मॅडम यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून दिल्यास तेही आयुष्यात यशस्वी होऊ शकतात असे सांगितले. प्रशासन अधिकारी जोत्सना शिंदे मॅडम यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व कौतुकाची थाप दिली. अशाप्रकारे बक्षीस वितरण कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी येथे पार पडला.