दिवे लावा म्हणणे खुळचटपणा आहे – राजू शेट्टी

0
572

 

मुंबई, दि.३ (पीसीबी) – दिवे लावण्यापेक्षा शांतपणे घरी बसा. घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करायला हवे होते. दिवे लावा म्हणणे खुळचटपणा आहे. अशी खोचक टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ”देशातील १३० कोटी भारतीयांनी ५एप्रिल ला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील सर्व दिवे बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. त्यावर शेट्टी यांनी टिका केली आहे.

” लॉक डाऊन अधिक सक्षमपणे राबवणे गरजेचे आहे. त्यांना घरात बसण्याचे आवाहन मोदींनी करायला हवे होते. अजूनही काही लोक विनाकारण बाहेर पडतात. त्यांना घराच्या बाहेर पडू नका. घरात बसा हे आवाहन मोदींनी कळकळीने करायला हवे होते. मात्र तसे न करता त्यांनी दिवे लावण्याची नवीन कल्पना लोकांना सांगितली आहे. दिवे लावून कोरोना कसा जाणार? लोकांनी घरात बसूनच कोरोना जाणार आहे.’असे शेट्टी म्हणाले.

तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील पंतप्रधानांच्या या आवाहनाची खिल्ली उडविली आहे. मोदींच्या निर्णयाच्या विरोधात तात्काळ ट्विट करत आव्हाड यांनी जबरी टीका केली आहे. “मला वाटलं मोदीजी काहीतरी खुशखबर देणार असतील की लस शोधली, मास्कची कमतरता पडू देणार नाही, किंवा आपण सर्वजण डॉक्टरांच्या मागे खंबीर उभे राहू. मात्र यांनी संकटाच्या काळातही इव्हेंट करायचे ठरवले आहे. तसेच ‘मी मुर्ख नाही. मी ‘त्या’ दिवशी एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी माझ्या घरातले दिवे बंद करणार नाही.