दिवाळीत सामान्यांचं ‘दिवाळ’! गॅस सिलिंडर महागले

0
593

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत. ही अल्प घसरण असली तरी जनतेला यातून थोडाफार दिलासा मिळतोय. परंतु, दरवाढीचा फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराला बसणार आहे. नोव्हेंबर महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही ५९ रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर अनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात २.९४ पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग सातवी वाढ आहे.