दिल्लीत ९ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

0
626

दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – दिल्लीतील समयपूर बदली भागामध्ये एका ९ वर्षाच्या चिमुकलवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी बदली येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला त्याच्या झोपडीमध्ये नेऊन तीच्यावर बलात्कार केला. अत्याचारानंतर पीडित मुलगी रडत घरी आली. परंतु, घरी कोणी नसल्यामुळे तीने तीच्या नातेवाईकांना घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडितेची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.