दिल्लीत राज ठाकरे, राहुल गांधींची ८ जानेवारीला भेट  

0
645

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय हालचाली गतिमान झाले आहेत. तर राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. ही भेट ८ जानेवारीला होण्याची शक्यता आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असणार आहे. या भेटीत कोणती चर्चा होणार? याची उत्सुकता राजकीय गोटात लागून राहिली आहे.