दिल्लीत मराठी कुटुंबातील दोघा सख्या बहिणींचा धारदार शस्त्राने वार करुन खून

0
734

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – राजधानी दिल्ली येथे राहणाऱ्या मराठी कुटुंबातील दोन सख्या वृध्द बहिणींचा धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातल्या आनंदवन सोसायटीत घडली.

आशा पाठक आणि उषा पाठक असे खून झालेल्या दोघा बहिणींची नावे आहेत. त्यांचे वय अंदाजे ७० ते ७२ वर्षांच्या आसपास होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा आणि उषा पाठक या दोघीही बहिणी अविवाहित होत्या. आनंदवन सोसायटीतील फ्लॅटमध्ये त्या दोघीच राहत होत्या. मयतांपैकी एक बहीण निवृत्त शिक्षिका होती, तर दुसरी ग्रंथपाल म्हणून कार्यरत होती. आरोपी दोघींच्या ओळखीतील असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे, कारण घरात बळजबरीने घुसखोरी केल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांनी घरातल्या काही कामासाठी प्लंबर बोलावला होता. त्यामुळे प्लंबरनेच दोघी वृद्ध बहिणींची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या पोलीस सोसायटीतले सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध घेत आहेत.