Desh

दिल्लीत पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार

By PCB Author

September 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – एका चारचाकीतून जाणाऱ्या चौघांनी पोलिसांवर गोळाबार केल्याची घटना समोर आली आहे. अक्षरधाम मंदिरांसमोर ही घटना घडली असून, त्यात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, गोळीबारानंतर संशयित फरार झाले आहेत. पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

चार आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून जात होते. दिल्ली पोलिसांच्या पथकाने अक्षरधाम मंदिराजवळ त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर गाडीतील सशस्त्रधारी संशयितांनी अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी गोळीबार करताच आरोपी फरार झाले. आरोपी गीता कॉलनीच्या दिशेने बेपत्ता झाले.

दरम्यान, या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.