दिल्लीत जाऊन ‘त्या’अधिकाऱ्याच्या कानाखाली मारणार – बच्चू कडू

0
1835

मुंबई, दि. (पीसीबी) – ज्या कोणी केंद्रातील अधिकाऱ्यांने दुष्काळाची नवी नियमावली तयार केली आहे. दिल्लीत  जाऊन त्या अधिकाऱ्याच्या कानाखाली  मारणार आहे , असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.  राज्यात भीषण दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. त्यात सरकारी पातळीवर काहीच हालचाली होताना दिसत नाही. तर अधिकारी मात्र, दुष्काळाची नियमावली तयार करण्यात गुंग आहेत. यावर कडू यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.    

राज्यातील शेतकरी  दुष्काळाने होरपळत आहे. यावर विधानसभेत कडू यांनी  सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आमदार बच्चू कडू म्हणाले की,  हा पावसाचा दुष्काळ असला, तरी सर्वांत मोठा अन्याय सरकारी धोरणे व सरकारी मानसिकतेने केला आहे. त्यामुळे  सरकार व अधिकारी यांच्या कारभाराच्या विरोधात  मंगळवारपासून  उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकांनी रामराज्याची मागणी केली होती. पण तुम्ही राममंदिरावरच भागवणार असाल, तर लोकं आता दुधखुळी राहिलेली नाहीत. या सरकारचा कारभार  शेतकरी-शेतमजूर व ग्रामीण जनतेविरोधात आहे .  सरकार  जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा दावा करत आहे. मात्र, ही योजना बोगस असून यशाबाबत सरकारकडून फेकूगिरी सुरू असल्याची टीका कडू यांनी यावेळी केली.